आशा, वेळ, जबाबदारी..

अरेवा.. मी ऍक्चुअली आणि ऍज युज्वल कंटाळून हा ब्लॉग चेक करायला आले.. तर चक्क वर्डप्रेस चेंज झालेलं दिसलं! कधी काळीच झालं असण्याची शक्यता आहे. मी आज पाहीलं.. सहीए.. नवीन बदल दिसला की काय बरं वाटतं.. नवीन कपडे, नवा दिवस, नवीन वर्षं, नवं घर, नवीन अभ्यास.. मी परवा म्हणूनच लिव्हींग रूमची ऍरेंजमेंट बदलली.. एव्हढंच काय, वातावरणातही बदल होत आहेत! प्रचंड थंडी होती , ती जाऊन गेला आठवडाभर उन्हाळा असल्यासारखं उकडलं.. आणि काल संध्याकाळपासून पाऊसच! छान वाटलं.. ( कधी वाटत नाही?) एव्हढे सगळे बदल चाललेत.. त्यातून ओबामा आला.. चेंज वी नीड! बघु काय बदल करतोय..

एकंदरीत बदलाचे वारे आहेत सद्ध्या  असं दिसतंय. मी ही माझ्यातला बदल नोटीस करत आहे. इथे मैत्रिणी मिळाल्या. जॉबच्या दृष्टीने (कदाचित) महत्वाची ठरेल अशी दिशा मिळाली.अजुनही बेकार आणि एकटीच असते दिवसभर. पण निगेटीव्ह विचार, अस्वस्थता, फ्रस्ट्रेशन कमी झाल्यासारखे वाटत आहे.. किंवा असले तरी मी ते व्यवस्थित हॅंडल करू शकते आहे.एकंदरीतच स्थिरता लाभल्यासारखे वाटत आहे.

खरंच, डबक्यात राहणार्‍या बेडकासारखी अवस्था झाली होती माझी.. डबकं चांगलं वाटू लागले.. बाहेरचं जग पाहण्याची निकड , गरजच उरली नाही.. आणि मुख्य म्हणजे, डबकं सोडून बाकीचे जग आहे, त्याचा वापर आपण करू शकतो. इत्यादी विचारही यायचे नाहीत. आता बाहेर पडायचा चान्स मिळाल्यावर समजतं मी कशा परिस्थितीत अडकले होते. इथे बाहेर पडणे म्हणजे दुध आणायला किंवा मॉल मधे हिंडायला जाणे हे मला अभिप्रेत नाहीए. बाहेर पडणे म्हणजे खर्‍या अर्थाने. स्वतंत्र, वेगळं, जबाबदार अस्तित्व असणे. जे इतके दिवस गायब झालं होते.अजुनही कितीतरी बदल होणे अपेक्षित आहे. पण ठीके, बदलांना सुरवात तर नक्कीच झाली आहे.तो हरवलेला कॉन्फीडन्स येतोय परत. दिसतोय मला! रादर तीच ओळख होती माझी एकेकाळी. कॉन्फीडंस, पॉझिटीव्ह विचार हीच माझी ओळख होती. खरंतर अजुनही मी ’ती ओळखआहे माझी’ असं म्हणू शकले असते.. पण नाही म्हणणार.. मला अल्पसंतुष्ट राहायचे नाहीए. बास झालं आता.. काही करायचं असेल विशेष तर मला ते सोडावंच लागेल. लो एम इज क्राईम म्हणतात ते उगाच नव्हे. मोठं स्वप्नं ठेवलंच पाहीजे मला समोर..

मध्यंतरी २५वा वाढदिवस झाला. खरंतर तेव्हाच हे सगळं जाणवलं.. आणि सटपटले मी! मी २५? केव्हढीश्शी होते मी, आहे मी?? नाही राहीलीस तू लहान. जबाबदार हो. जाणीव ठेव त्यांची! माझं मन आक्रंदत होते. गाढ झोपले असताना कोणीतरी जोरदार थंड पाण्याचा सपकारा मारावा तसं ते फिलिंग. अचानक आयुष्य / वेळ हा क्षणभंगुर आहे अशी जाणीव झाली.  खरं काही गरज नव्हती. पण मी स्वतःला इतकी लहान समजत होते, की २५ हा आकडा माझ्यासठी धक्का होता.. कधी आला हा आकडा माझ्या आयुष्यात असं वाटावं इतक्या फास्ट! तेव्हा समजलं.. तुम्हाला नाही कळत कधी वेळ/काळ निघून जातो.. वेळेत काही केलं नाही, की पश्चाताप होतो. तसं नको असेल तर जागी हो.. जागी हो! कर काहीतरी, चार पैसे कसे का होईना मिळव, पुस्तकं घे विकत, गाणी आइक आवडीची, चित्रं काढ, गा मनसोक्त, मनातील भिती,संकोच फेकून दे, मनाला येईल तशी अर्थात जबाबदारीच भान ठेऊन वाग! गेलेला वेळ परत नाही येणारे..

हे लवकर ध्यानात घे, आणि वाग…

Over n Out ..

कंटाळा……

कसा पाझरतोय ना कंटाळा.. पोस्टचं नाव, टॅग मधुन.. :)

फार कंटाळा आलाय.. हल्ली आयुष्य म्हणजे एक मोनोटोनस प्रकार झालाय. नोकरीवर जाणार्‍यांना एक रुटीन असतं, वर्षानुवर्षं तेच रुटीन. सकाळी अमुक वेळेला ऑफीसला जा, अमुक वेळेस परत. विकेंडला टाईमपास. पण माझं काय? मला काही जॉब नाहीए आत्ता. करूच शकत नाही इथे.. मग कसलं रुटीन! सकाळी कधीही उठा, आरामात आवरा.. स्वयपाक करा,जेवा.. मग झोप/नेट/वाचन वगैरे. किती दिवस झाले मी याशिवाय वेगळं काही केलंच नाही. हा आता कधीतरी चित्रं काढते, कधी लिहीते.. येतात कधीतरी क्रिएटीव्ह होण्याचे झटके. पण ते काही रोज येत नाहीत. मग रोजचा दिवस घालवा इतकंच काम..

किती ते मोनोटोनस आयुष्य?? तरी आपल्या परीने मी प्रयत्न करते कंटाळा न येण्याचा.. पण तो तरी किती वाट पाहणार. त्याला यावंच लागतं.. काय करायचं अशा वेळेला?

मॉल मधे फिरणे,
मॉर्निंग वॉक/इव्हीनिंग वॉक म्हणून फिरणे,
उगीचच फिरणे,
कुणाला (म्हणजे १नाहीतर २ मैत्रिणींना) फोन करून पिड्णे,
आजुबाजुला लोकंच नाहीत गप्पा मारायला मग कोणाशी बोलायचं?

नवीन मैत्री करा, लोकांशी ओळखी वाढवा वगैरे सल्ले ऐकतो आपण नेहेमी. पण ते भारतात ठीके हो! इथे काय? माझ्या आसपास अमेरिकन्स सोडले तर फार नाहीचे कोणी.. जे काही इंडीयन्स आहेत, त्यांच्याशी अगदी ऑर्कुटवर शोधून कॉन्टॅक्ट केला.. एखाद दोन वेळा झालं बरं बोलणं.. पण आपणहून फोन करावा, गप्पा माराव्यात असं नाहीच जुळलं.. काय त्या मुली.. इथे राहून फालतू कम्पॅरिझन्स आणि सास बहु सिरिअल्स मधे अडकलेल्या.. आमच्याकडे ना असं आहे, अय्या तुमच्याकडे तसं आहे??? या काय गप्पा आहेत? कोणीही चांगली पुस्तकं वाचत नाही की ज्यावर डिस्कस करता येईल.. एखादी सुंदर डॉक्युमेंट्री बघितली, सांगितली.. नाहीच! काय त्या चर्चा सतत टीव्ही वरच्या प्रॉग्राम्सवर.. असतो स्वभाव एकेकाचा.. पण माझी गोची होतीय ना.. मला माझ्या भारतातल्या सारख्या मैत्रिणीच नाही मिळत. तासन्तास गप्पा चालायच्या आमच्या.. पुस्तकं, कुठली भाषा, इतिहास, एकंदरीतच समविचारी मैत्रीणी होत्या..

इथे आधीच लोकं कमी आपली..जुळवून घ्या म्हणजे झालं.. भारतात असताना मी चांगलीच एकलकोंडी होते. भरपूर माणसात राहूनही बोलणं, लोकांमधे मिसळाणं कमी.. आता उट्टं निघतय काय त्याचं?? :(

भारत.. ते जाऊदे ती फार लांबची गोष्ट…, आपलं घर, आपली माणसं काय चिज आहे हे इतकं लांब आल्यावर समजतं..
यासाठी तरी घरापासून भरपूर लांब, शक्यतो देशाबाहेर राहून पाहीलंच पाहीजे. किती नविन गोष्टी कळतात, स्वतःचीच नव्याने जाणीव होते.. !

पण तरी कंटाळा हा येतोच..
कसा घालवावा?
असं काहीतरी निरर्थक लिहून?
मेबी..
वेळ तर गेला अर्धा तास..
पुढचा दिवस कमेंट्स आल्यात का चेक करण्यात जाइल..

गुड डील! :)

एनिग्मा !!!

खरंतर इतक्या लगेच दुसरं पोस्ट लिहायचा माझा विचार अजिबातच नव्हता.. जरा नव्या ब्लॉगचे नवेपण एन्जॉय करत होते..! आणि नेहेमीसारखी नेटवर ब्राऊझ करताना गाणी ऐकत बसले होते.. आणि वाटलं लिहावं गाण्यांवर.. ते पण माझा सगळ्यात आवडत्या म्युझिक ग्रुप बद्दल.. Enigma !!

एनिग्मा हा एक म्युझिकल प्रोजेक्ट आहे,जो michael cretu,david fairstein,frank peterson या लोकांनी मिळून बनवला १९९० मधे.. क्रेटूची बायको सॅंड्रा काही गाण्यांना व्होकल्स देते..अन्य माहीती विकिपिडीया वर मिळेलच!

या ग्रुपबद्दल निदान मराठी विश्वात फार काही लिहीलं गेलं नाहीये असे दिसतय.. चान्सेस कमीच आहेत म्हणा.. कारण माझ्या एवढ्या मोठ्या मित्र-मंडळामधे एनिग्मा आवडणारे अगदी (एका) हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी लोकं भेटली.. बाकी असंख्य लोकांना त्यांची गाणी म्हणजे सॅड, गंभीर,गुढ,mysterious आणि depressing वाटली.. त्यातलं डीप्रेसींग सोडलं तर बाकी सगळं खरं आहे.. नावाप्रमाणे सगळी गाणी एनिग्माटीक आहेत.. मला जमेल तसं लिहून बघते त्यांच्या गाण्यांबद्दल..!

माझ्या या झपाटलेपणाला सुरवात झाली Sadness या गाण्यापासून.. (इथे मला नमूद केले पाहीजे, की एनिग्माचे व्हीडिओज जरा विक्षिप्त असतात.. बर्‍याचदा काही कळत नाही काय चाललंय.. मुद्दाम गुढ थीम ठेवत असावेत.. किंवा गाण्यातून काय घ्यायचं ते प्रेक्षकांवर सोडल्यासारखे.. ) असो.. हे गाणं सुरू होतं आणि आपण लिटरली एका वेगळ्या विश्वात जातो.. गाण्याचे बीट्स,सुंदर म्युझीक,कमीत कमी पण वेगळीच लिरीक्स, वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स,वेग-वेगळ्या भाषेमधील चॅंट्स हे एनिग्माचे वैशिष्ट्य ! असं मी तरी आधी कधीच ऐकले नसल्याने मेज्जर ओढले गेले एनिग्माकडे..

यानंतर मी एका मागोमाग एक गाणी ऐकतच सुटले.. नशीबाने जवळपास सगळं एनिग्माचे कलेक्शन मला मिळाले.. आणि खरंच झपाटले.. त्यानंतर मी गाणं पाहीलं ते म्हणजे Return of innocence .. हे बहुतेकांना माहीत असायची शक्यता आहे.. माणसाच्या मृत्युपासून जन्मापर्यंत असा उलट्या पद्धतीने घेतलेला हा व्हीडीओ फारच छान आहे!

असेच T.N.T. for the brain .. या नावाच्या अर्थापासून ते व्हीडीओपर्यंत काय आहे ते काही कळत नाही.. परंतू अफलातून गाणं! गाण्याच्या सुरवातीला चक्क आपला तबला आहे! मस्तपैकी आपल्याला धक्का देऊन हे गाणं चालू होते, ते पुर्ण गाणंभर तो तबला कानामधे निनादत राह्तो.. अफाट गाणं आहे राव.. डोळे मिटून हे गाणं ऐकायचं बस्स. काय वेगळा अनुभव येतो.. मला स्वतःला कुठेतरी एका शांत समुद्रकिनार्‍यावर एकटीच बसलीय असा फील येतो हे गाणं ऐकताना.. तर माझ्या मैत्रीणीला एका गर्द जंगलात हरवल्यासारखे वाटले होते.. जसे जसे गाणे पुढे जाते तसा रिदम , तबल्याची गती वाढायला लागते.. आणि हे गाणं अक्षरशः चढतं!! खरंतर, नीट ऐकले तर तबला आहे त्याच गतीने वाजताना दिसतो.. परंतू आपल्याला ते इतकं फास्ट चालूय असं वाटतं ना.. भारी प्रकार आहे बुआ!

दुसरं एक गाणं.. Push the limits .. हे अजुन थोडं वेगळं गाणं! शब्द म्हणाल तर फार काही नाही.. पण तरी व्हीडीओ याचा जर पाहीलात तर समजेल की स्त्री आणि पुरूष यांच्या मधील द्वंद्व आहे हे.. ते एनिग्माने सेक्स आणि केंदो या गेमच्या माध्यमातून दाखवले आहे.. कधी पुरूष वरचढ ठरतो तर कधी स्त्री.. पण शेवटी एका बाजूला पुरूष जिंकताना दाखवलाय तर दुसरीकडे स्त्री.. या व्हीडीओचे खूप अर्थ लागू शकतात.. एक म्हणजे its about two forming into one.. रिलेशन्शीप मधे कधीकधी आपण एकमेकांच्या वरचढ होण्याचा प्रयत्न करतो, पण तसे नसते.. रिलेशनशीप ही दोघांनी मिळून पुढे न्यायची.. one can’t exist without the other.. किंवा हे एकाच माणसाच्या दोन बाजू असतील.. बरेच अर्थ निघू शकतात विचार करायचा झाला तर.. इव्हन युट्युबवरच्या व्हीडीओवर कमेंट्स मधे लोकं त्यांचे त्यांचे तर्क सांगतात.. ते पण पट्णेबल आहे.. एकंदरीत वेगळं गाणं, वेगळा व्हीडीओ.. ( एनिग्मा या ग्रीक शब्दाचं मीनींग आहे, रिड्ल.. ! सगळे व्हीडीओज रीड्ल्सच आहेत! :) )

मी सगळ्यात थक्क झाले ते child in us या गाण्यात संस्कृत ऐकुन!!! तोपर्यंत मला कळून चुकले होते की हे जरा वेगळे काम आहे.. जॉर्जियन,तैवानियन वगैरे चॅंट्स असतात यांच्या गाण्यात.. पण संस्कृत!? फार मस्त वाटत त्यामुळे हे गाणं ऐकताना.. तसं बाकी काही नाहीय.. पण एनिग्माच म्युझिक, आणि बॅकग्राऊंडला संस्कृत श्लोक.. मेडीटेशन साठी पर्फेक्ट कॉम्बो ! ( बायदवे, तसही एनिग्माची गाणी कॉन्संट्रेशनसाठी बेस्ट आहेत.. मी माझा सगळा इंजिनिअरींगचा अभ्यास एनिग्माच्या गाण्यावर केलाय.. try it! )

beyond the invisible !! माझं सगळ्यात आवडतं गाणं.. त्यातलं ते ” Sajaja bramani totari ta, raitata raitata, radu ridu raitata, rota ” ऐकायला फार मस्त वाटतं.. ही कुठली भाषा ते मी चेक नाही केलं.. पण असो.. लिरीक्सपेक्षाही मला व्हीडीओ आवडतो.. विचित्र असणारच.. पण त्यात जंगलात ice skating घेतलंय ते सिंपली अमेझिंग आहे! गाण्याच्या बीट्स वर ते स्केटींग करतात ते बघितलंच पाहीजे..

मी इथे सगळी गाणी नाही लिहू शकत.. पण या २ गाण्यांचा उल्लेख केलाच पाहीजे.. पहीलं म्हणजे, 20,000 miles over the sea .. असलं शांत गाणं आहे ना हे.. आणि ज्यानी कोणी हा व्हीडीओ तयार केलाय त्याला मानलं.. ऑफिशियल व्हीडीओ नाहीय.. पण अमेझिंग वर्क डन ! तो गाण्यातला सुदींग इफेक्ट व्हीडीओत पण आलाय ! नक्की बघा !

दुसरं अतिप्रिय गाणं म्हणजे Invisible love ! ह्म्म, माझे शब्द आता कमी पडत चाललेत.. छान वाटतं हे खूप कमी पडतंय सांगायला पण फार्र-फार्र आवडतं हे गाणं मला.. हा (अनॉफिशिअल)व्हीडीओ आहे..

अजुन चिक्कार गाणी आहेत.. एनिग्माबद्दल मी कितीही बोलू शकत असले तरी माझ्या मर्यादा मला माहीती आहेत! मला हे सगळं शब्दात नाही सांगता येणारे.. पण बर्‍याच जणांना एनिग्मा म्हणजे काहीतरी wierd,depressing प्रकार वाटतो, तसा मला नाही वाटत.. रादर, मला तो जरा जास्तच अमेझिंग प्रकार वाटतो.. असं म्युझिक सुचतं कसं,किती ते कष्ट? असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स,चॅंट्स आणून गाण्यात वापर करा..सुंदर गाणी वर्षानुवर्ष तयार करताय्त ही लोकं..मला गाणं गाऊ शकणार्‍या लोकांबद्दल खूप हेवा वाटतो,की कसं आवडीचं गाणं गाऊ शकतात वगैरे.. पण एनिग्मा सापडल्यापासून हेव्याच्याही पुढची पायरी ओलांडली आहे! कसं जमतं? आपल्याला ते नाही जमत तर निदान त्याच्यावर लिहून तरी बघावं म्हणून हा खटाटोप..!! :)

हॅलो मराठी ब्लॉग-वर्ल्ड !!

हॅलो मराठी ब्लॉग-वर्ल्ड !!

हे माझं पहीलं पोस्ट.. पण पहीला ब्लॉग नाही.. त्यामुळे ती नव्याने लिहायची उत्सुकता नाहीय.. पण तरी अनामिक राहून ब्लॉगींग करायची हुक्की आल्याने हा प्रपंच.. बर्‍याचदा काही गोष्टी सांगायच्या असतात, पण नाही लिहील्या जात.. अनॉनिमस राहून ते जमेल असं वाटतय.. बघुया काय होतय.. जसं ब्लॉगचे नाव आहे , तसच मी इथे वाट्टेल ती बडबड करणारे.. तुम्हाला आवडली तर सांगा.. नाहीतरी मी स्वान्तसुखाय लिहीतच असेन.. पण कमेंट्स आल्या की छान वाटते हे जगन्मान्य फिलींग आहे.. सो आवडतील कमेंट्स !! :)

कुणी विचार करेल की नाही माहीत नाही, पण ही कोण जुनी ब्लॉगर बुवा असा विचार करत नका बसू ! :) आणि इन केस कळलच काही, तर डिस्क्लोज नका करू मात्र !! :)

चलो मग, खूप लिहायचं आहे.. भेटूच परत! तो पर्यंत बाय बाय !! शुभ-रात्री !