हॅलो मराठी ब्लॉग-वर्ल्ड !!
हे माझं पहीलं पोस्ट.. पण पहीला ब्लॉग नाही.. त्यामुळे ती नव्याने लिहायची उत्सुकता नाहीय.. पण तरी अनामिक राहून ब्लॉगींग करायची हुक्की आल्याने हा प्रपंच.. बर्याचदा काही गोष्टी सांगायच्या असतात, पण नाही लिहील्या जात.. अनॉनिमस राहून ते जमेल असं वाटतय.. बघुया काय होतय.. जसं ब्लॉगचे नाव आहे , तसच मी इथे वाट्टेल ती बडबड करणारे.. तुम्हाला आवडली तर सांगा.. नाहीतरी मी स्वान्तसुखाय लिहीतच असेन.. पण कमेंट्स आल्या की छान वाटते हे जगन्मान्य फिलींग आहे.. सो आवडतील कमेंट्स !!
कुणी विचार करेल की नाही माहीत नाही, पण ही कोण जुनी ब्लॉगर बुवा असा विचार करत नका बसू !
आणि इन केस कळलच काही, तर डिस्क्लोज नका करू मात्र !!
चलो मग, खूप लिहायचं आहे.. भेटूच परत! तो पर्यंत बाय बाय !! शुभ-रात्री !

Shailesh S. Khandekar म्हणाले,
मे 22, 2008 at 4:37 pm
नवीन अनुदिनीनिमित्त हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप-खूप शुभेच्छा! मराठी ब्लॉग विश्वचा दुवा आपल्या वर्डप्रेस आधारित अनुदिनीवर येण्यासाठी http://marathiblogs.net/logo_on_wordpress हा दुवा उपयुक्त आहे.
mazibadbad म्हणाले,
मे 22, 2008 at 7:04 pm
thanks alot !! mala samajatch navta..
Ruchira म्हणाले,
मे 28, 2008 at 1:06 pm
marathi blogword madhe tuze swagat aahe.
Vaidehi म्हणाले,
जून 3, 2008 at 9:30 pm
Welcome!