कंटाळा……

कसा पाझरतोय ना कंटाळा.. पोस्टचं नाव, टॅग मधुन.. :)

फार कंटाळा आलाय.. हल्ली आयुष्य म्हणजे एक मोनोटोनस प्रकार झालाय. नोकरीवर जाणार्‍यांना एक रुटीन असतं, वर्षानुवर्षं तेच रुटीन. सकाळी अमुक वेळेला ऑफीसला जा, अमुक वेळेस परत. विकेंडला टाईमपास. पण माझं काय? मला काही जॉब नाहीए आत्ता. करूच शकत नाही इथे.. मग कसलं रुटीन! सकाळी कधीही उठा, आरामात आवरा.. स्वयपाक करा,जेवा.. मग झोप/नेट/वाचन वगैरे. किती दिवस झाले मी याशिवाय वेगळं काही केलंच नाही. हा आता कधीतरी चित्रं काढते, कधी लिहीते.. येतात कधीतरी क्रिएटीव्ह होण्याचे झटके. पण ते काही रोज येत नाहीत. मग रोजचा दिवस घालवा इतकंच काम..

किती ते मोनोटोनस आयुष्य?? तरी आपल्या परीने मी प्रयत्न करते कंटाळा न येण्याचा.. पण तो तरी किती वाट पाहणार. त्याला यावंच लागतं.. काय करायचं अशा वेळेला?

मॉल मधे फिरणे,
मॉर्निंग वॉक/इव्हीनिंग वॉक म्हणून फिरणे,
उगीचच फिरणे,
कुणाला (म्हणजे १नाहीतर २ मैत्रिणींना) फोन करून पिड्णे,
आजुबाजुला लोकंच नाहीत गप्पा मारायला मग कोणाशी बोलायचं?

नवीन मैत्री करा, लोकांशी ओळखी वाढवा वगैरे सल्ले ऐकतो आपण नेहेमी. पण ते भारतात ठीके हो! इथे काय? माझ्या आसपास अमेरिकन्स सोडले तर फार नाहीचे कोणी.. जे काही इंडीयन्स आहेत, त्यांच्याशी अगदी ऑर्कुटवर शोधून कॉन्टॅक्ट केला.. एखाद दोन वेळा झालं बरं बोलणं.. पण आपणहून फोन करावा, गप्पा माराव्यात असं नाहीच जुळलं.. काय त्या मुली.. इथे राहून फालतू कम्पॅरिझन्स आणि सास बहु सिरिअल्स मधे अडकलेल्या.. आमच्याकडे ना असं आहे, अय्या तुमच्याकडे तसं आहे??? या काय गप्पा आहेत? कोणीही चांगली पुस्तकं वाचत नाही की ज्यावर डिस्कस करता येईल.. एखादी सुंदर डॉक्युमेंट्री बघितली, सांगितली.. नाहीच! काय त्या चर्चा सतत टीव्ही वरच्या प्रॉग्राम्सवर.. असतो स्वभाव एकेकाचा.. पण माझी गोची होतीय ना.. मला माझ्या भारतातल्या सारख्या मैत्रिणीच नाही मिळत. तासन्तास गप्पा चालायच्या आमच्या.. पुस्तकं, कुठली भाषा, इतिहास, एकंदरीतच समविचारी मैत्रीणी होत्या..

इथे आधीच लोकं कमी आपली..जुळवून घ्या म्हणजे झालं.. भारतात असताना मी चांगलीच एकलकोंडी होते. भरपूर माणसात राहूनही बोलणं, लोकांमधे मिसळाणं कमी.. आता उट्टं निघतय काय त्याचं?? :(

भारत.. ते जाऊदे ती फार लांबची गोष्ट…, आपलं घर, आपली माणसं काय चिज आहे हे इतकं लांब आल्यावर समजतं..
यासाठी तरी घरापासून भरपूर लांब, शक्यतो देशाबाहेर राहून पाहीलंच पाहीजे. किती नविन गोष्टी कळतात, स्वतःचीच नव्याने जाणीव होते.. !

पण तरी कंटाळा हा येतोच..
कसा घालवावा?
असं काहीतरी निरर्थक लिहून?
मेबी..
वेळ तर गेला अर्धा तास..
पुढचा दिवस कमेंट्स आल्यात का चेक करण्यात जाइल..

गुड डील! :)

9 प्रतिक्रिया

  1. Shailesh S. Khandekar म्हणाले,

    ऑक्टोबर 15, 2008 at 1:10 सकाळी

    मला कंटाळा आला की मी “अनंत” या संज्ञेबद्दल विचार करतो. कंटाळा आपसूकच पळून जातो.

    http://vidagdha.wordpress.com/2006/09/05/anant3/

  2. Sadhana म्हणाले,

    ऑक्टोबर 15, 2008 at 4:55 सकाळी

    मला कंटाळा आला की मी Diary lihite, Pustake/Books Vachate. कंटाळा आपसूकच पळून जातो.

  3. KUNAL म्हणाले,

    ऑक्टोबर 15, 2008 at 5:06 सकाळी

    MALA PAN KHUP KANTALA ALAY

  4. PRAVIN P म्हणाले,

    ऑक्टोबर 15, 2008 at 5:08 सकाळी

    KAN…..TA……LA…………………………..

  5. mazibadbad म्हणाले,

    ऑक्टोबर 15, 2008 at 10:25 सकाळी

    वा धन्यवाद शैलेश, इंटरेस्टींग प्रकार दिसतोय. आत्ता वरवर चाळलंय, निवांत वाचीन परत..

    बाकी सर्वांना कमेंटसाठी धन्यवाद! :)

  6. PRAVIN P म्हणाले,

    ऑक्टोबर 15, 2008 at 10:30 pm

    Kantala Alay Call Gheun-Gheun…Teach Teach Call, Tech Tae Customer ,Tech Bad-Bad….Karan Ki Mi BPO Madhe Kam Karto (Beuz Now I’m Working )

  7. kiran म्हणाले,

    ऑक्टोबर 16, 2008 at 1:35 सकाळी

    hi varil kantala kavita vachun mala chan vatale sarva jan ekach ek sangtat kunalahi vichara kay cahalaly tar ekach kahi nahi kantala alay,atta tar he eaikun eakun tar se vate ki, kahi divsanni hya kantalyacha hi kantala yenar ahe lokana.

  8. mazibadbad म्हणाले,

    ऑक्टोबर 16, 2008 at 10:39 सकाळी

    किरण धन्यवाद.. ती कविता नाहीए खरंतर.. असो..
    कंटाळा आलाय हे सद्ध्याचं बाय डिफॉल्ट येणारं उत्तर आहे.. :)
    आपल्या आईबाबांनी , आजीआजोबांनी नाही कधी उच्चारला हा शब्द..! पण आपण का इतका घोष लावतो? काय माहीत!

  9. Maithili म्हणाले,

    फेब्रुवारी 3, 2009 at 9:59 pm

    malahi jam kantala aalay. pharak phakt evdhach aahe ki tumhi ameriket, parkya mansat pakatay aani mi aaplyach deshat aplyach stupid aani irritated manasan mule pakatey.


टिप्पणी नोंदवा