आशा, वेळ, जबाबदारी..

अरेवा.. मी ऍक्चुअली आणि ऍज युज्वल कंटाळून हा ब्लॉग चेक करायला आले.. तर चक्क वर्डप्रेस चेंज झालेलं दिसलं! कधी काळीच झालं असण्याची शक्यता आहे. मी आज पाहीलं.. सहीए.. नवीन बदल दिसला की काय बरं वाटतं.. नवीन कपडे, नवा दिवस, नवीन वर्षं, नवं घर, नवीन अभ्यास.. मी परवा म्हणूनच लिव्हींग रूमची ऍरेंजमेंट बदलली.. एव्हढंच काय, वातावरणातही बदल होत आहेत! प्रचंड थंडी होती , ती जाऊन गेला आठवडाभर उन्हाळा असल्यासारखं उकडलं.. आणि काल संध्याकाळपासून पाऊसच! छान वाटलं.. ( कधी वाटत नाही?) एव्हढे सगळे बदल चाललेत.. त्यातून ओबामा आला.. चेंज वी नीड! बघु काय बदल करतोय..

एकंदरीत बदलाचे वारे आहेत सद्ध्या  असं दिसतंय. मी ही माझ्यातला बदल नोटीस करत आहे. इथे मैत्रिणी मिळाल्या. जॉबच्या दृष्टीने (कदाचित) महत्वाची ठरेल अशी दिशा मिळाली.अजुनही बेकार आणि एकटीच असते दिवसभर. पण निगेटीव्ह विचार, अस्वस्थता, फ्रस्ट्रेशन कमी झाल्यासारखे वाटत आहे.. किंवा असले तरी मी ते व्यवस्थित हॅंडल करू शकते आहे.एकंदरीतच स्थिरता लाभल्यासारखे वाटत आहे.

खरंच, डबक्यात राहणार्‍या बेडकासारखी अवस्था झाली होती माझी.. डबकं चांगलं वाटू लागले.. बाहेरचं जग पाहण्याची निकड , गरजच उरली नाही.. आणि मुख्य म्हणजे, डबकं सोडून बाकीचे जग आहे, त्याचा वापर आपण करू शकतो. इत्यादी विचारही यायचे नाहीत. आता बाहेर पडायचा चान्स मिळाल्यावर समजतं मी कशा परिस्थितीत अडकले होते. इथे बाहेर पडणे म्हणजे दुध आणायला किंवा मॉल मधे हिंडायला जाणे हे मला अभिप्रेत नाहीए. बाहेर पडणे म्हणजे खर्‍या अर्थाने. स्वतंत्र, वेगळं, जबाबदार अस्तित्व असणे. जे इतके दिवस गायब झालं होते.अजुनही कितीतरी बदल होणे अपेक्षित आहे. पण ठीके, बदलांना सुरवात तर नक्कीच झाली आहे.तो हरवलेला कॉन्फीडन्स येतोय परत. दिसतोय मला! रादर तीच ओळख होती माझी एकेकाळी. कॉन्फीडंस, पॉझिटीव्ह विचार हीच माझी ओळख होती. खरंतर अजुनही मी ’ती ओळखआहे माझी’ असं म्हणू शकले असते.. पण नाही म्हणणार.. मला अल्पसंतुष्ट राहायचे नाहीए. बास झालं आता.. काही करायचं असेल विशेष तर मला ते सोडावंच लागेल. लो एम इज क्राईम म्हणतात ते उगाच नव्हे. मोठं स्वप्नं ठेवलंच पाहीजे मला समोर..

मध्यंतरी २५वा वाढदिवस झाला. खरंतर तेव्हाच हे सगळं जाणवलं.. आणि सटपटले मी! मी २५? केव्हढीश्शी होते मी, आहे मी?? नाही राहीलीस तू लहान. जबाबदार हो. जाणीव ठेव त्यांची! माझं मन आक्रंदत होते. गाढ झोपले असताना कोणीतरी जोरदार थंड पाण्याचा सपकारा मारावा तसं ते फिलिंग. अचानक आयुष्य / वेळ हा क्षणभंगुर आहे अशी जाणीव झाली.  खरं काही गरज नव्हती. पण मी स्वतःला इतकी लहान समजत होते, की २५ हा आकडा माझ्यासठी धक्का होता.. कधी आला हा आकडा माझ्या आयुष्यात असं वाटावं इतक्या फास्ट! तेव्हा समजलं.. तुम्हाला नाही कळत कधी वेळ/काळ निघून जातो.. वेळेत काही केलं नाही, की पश्चाताप होतो. तसं नको असेल तर जागी हो.. जागी हो! कर काहीतरी, चार पैसे कसे का होईना मिळव, पुस्तकं घे विकत, गाणी आइक आवडीची, चित्रं काढ, गा मनसोक्त, मनातील भिती,संकोच फेकून दे, मनाला येईल तशी अर्थात जबाबदारीच भान ठेऊन वाग! गेलेला वेळ परत नाही येणारे..

हे लवकर ध्यानात घे, आणि वाग…

Over n Out ..

हॅलो मराठी ब्लॉग-वर्ल्ड !!

हॅलो मराठी ब्लॉग-वर्ल्ड !!

हे माझं पहीलं पोस्ट.. पण पहीला ब्लॉग नाही.. त्यामुळे ती नव्याने लिहायची उत्सुकता नाहीय.. पण तरी अनामिक राहून ब्लॉगींग करायची हुक्की आल्याने हा प्रपंच.. बर्‍याचदा काही गोष्टी सांगायच्या असतात, पण नाही लिहील्या जात.. अनॉनिमस राहून ते जमेल असं वाटतय.. बघुया काय होतय.. जसं ब्लॉगचे नाव आहे , तसच मी इथे वाट्टेल ती बडबड करणारे.. तुम्हाला आवडली तर सांगा.. नाहीतरी मी स्वान्तसुखाय लिहीतच असेन.. पण कमेंट्स आल्या की छान वाटते हे जगन्मान्य फिलींग आहे.. सो आवडतील कमेंट्स !! 🙂

कुणी विचार करेल की नाही माहीत नाही, पण ही कोण जुनी ब्लॉगर बुवा असा विचार करत नका बसू ! 🙂 आणि इन केस कळलच काही, तर डिस्क्लोज नका करू मात्र !! 🙂

चलो मग, खूप लिहायचं आहे.. भेटूच परत! तो पर्यंत बाय बाय !! शुभ-रात्री !

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया